अनंत चतुर्दशीलाच सुट्टी द्या ! गणेशोत्सव समितीची मागणी

Grant Holiday on Anant Chaturdashi

मुंबई– राज्य सरकारने गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच काल अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi)दिवशी मिळणारी सुट्टी अचानक रद्द करण्याची घोषणा केली. परंतु या निर्णयामुळे नोकरदारांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच अनंत चतुर्दशी दिवशी सुट्टी लागू करावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने (Public Ganeshotsav Coordination Committee)सरकारकडे केली आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर (Naresh Dahibavkar) म्हणाले की,अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे वाहतूककोंडीचा (traffic congestion) प्रश्न निर्माण होतो. शिवाय कामगारांना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने या दिवशी लागू असणारी सुट्टी कायम ठेवावी.

राज्यात १९९५ मध्ये गणेशोत्सव समितीने शिवसेनेच्या सत्ताकाळात अनंत चतुर्दशीदिवशी सुट्टी (holiday on Anant Chaturdashi) मिळावी आणि महापालिकेची मैदाने गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली होती. यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी(Chief Minister Manohar Joshi) यांना समन्वय समितीच्या मागणीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी लागू करण्यात आली आहे. तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray)यांच्यामुळे लागू करण्यात आलेली अनंत चतुर्दशीदिवशी मिळणारी सुट्टी पूर्वीप्रमाणेच राहू द्यावी.