Maharashtra Heat wave Alert | भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा (Heatwave Alert) इशारा दिला असून, पुढील 3 दिवस राज्यात तापमान धोक्याच्या स्तरावर राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत आधीच तापमान 45°C पर्यंत गेले आहे.
14 जिल्ह्यांना येलो अलर्ट
IMD ने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या 14 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.
तापमानात मोठी वाढ
एप्रिल 22 रोजी चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान 45°C, अकोला आणि अमरावती येथे 44°C, तर नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि सोलापूरमध्ये 43°C तापमान नोंदले गेले. जळगाव, मालेगाव, धाराशिव, परभणी आणि नाशिकमध्ये पारा 42°C च्या वर गेला.
28 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता
IMD च्या अंदाजानुसार, उष्णतेची लाट (Heatwave) एप्रिल 28 पर्यंत कायम राहू शकते. उत्तर आणि मध्य भारतात तापमानात 2°C ते 3°C, तर गुजरात व पूर्व भारतात 3°C ते 5°C वाढ होण्याचा अंदाज आहे.
कोकण व मराठवाड्यात दमट हवामानाचा इशारा
कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मराठवाड्यात सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड या भागांत दमट हवामानाची (Humidity Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना दुपारच्या वेळेत घरात राहण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ईशान्य भारतात पावसाचा अंदाज
याउलट, ईशान्य भारतात एप्रिल 27 पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा (Rain Forecast) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सावधगिरीसाठी सूचना:
- दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळा
- भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड राहा
- हलके व हवेशीर कपडे वापरा
- उष्माघाताची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्या
- लहान मुले, वृद्ध आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्या