Heavy Rain : महाराष्ट्रातील तब्बल १७ जिल्ह्यांना (17 districts)१३ ते १८ सप्टेंबरदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान (India Meteorological Department) खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याची (flood-like situations)शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन-चार दिवसांत दिल्लीत (Delhi)तापमान वाढून उष्णतेत वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेशात ११ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा कालावधी सुरू होण्याची शक्यता आहे, तर बिहारमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
हे देखील वाचा –
राजस्थान रॉयल्सच्या सीईओंचाही राजीनामा
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण