मुंबई – राज्यात अकोला (Akola), बुलडाणा , वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, बीड, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आणि मुंबई व नवी मुंबईत मुसळधार आणि ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने (IMD)काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (orange alerts) तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने(administration)नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बीड (Beed)जिल्ह्यातील माजलगाव परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. माजलगाव तालुक्यातील कोथाळा गावच्या सरस्वती नदीला (Saraswati River)पूर आला. या पुरामुळे कोथाळा आणि सिरसाळा गावांचा संपर्क तुटला. परभणीत पाच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली. पाथरी तालुक्यात गोदावरीवरील (Godavari River in Pathri taluka)ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. तर हदगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आणि इंदिरानगर वस्तीतही पाणी शिरल्याने (floodwaters) जनजीवन विस्कळीत झाले.
जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. मंठा आणि परतूर तालुक्यांतील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यांत बन, बरडा या गावांत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. या भागात पूपरिस्थिती निर्माण झाली. बरडा आणि बन या दोन्ही गावांच्या शिवारात असलेल्या महादेव मंदिराला पुराने वेढा घातला. या पुरच्या पाण्यात एका पुजाऱ्यासह अन्य दोघे अडकले होते. पूर्णा नदीलाहीद्धा पूर आला. लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, किल्लारी, रेणापूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
सततच्या पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण ९२ टक्के भरले. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात लेंडी नाल्याला आलेल्या पुरात (flood)वाहून गेल्याने एका १७ मुलाचा मृत्यू झाला. या नाल्याच्या पुरामुळे पंचगव्हाण निंभोरा हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा गावासह शेलुबाजार परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. कंझरा ते पिंपरी खुर्द गावांचा संपर्क तुटला. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू होता. पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रासह परिसरातही मुसळधार पाऊस झाला. पांग्रा डोळे गावात शेतातील वाहणारे पाणी गावातील काही घरात शिरले असून घरांतील साहित्याचे नुकसान झाले. वाशिममध्ये सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला. पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड – मेहकर, करडा -गोभणी, सरपखेड – धोडप बुद्रुक हे रस्ते बंद झाले. त्यामुळे या तिन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.
आज पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग पावसामुळे वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यांचा संपर्क तुटला. देवगड, मालवण येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळी मुंबईतील अनेक भागांत आणि नवी मुंबईत खारघर, बेलापूर, वाशी, नेरूळ या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.