मुंबई मनपातील कंत्राटी सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय ! 8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार

Brihanmumbai Municipal Corporation

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या (Brihanmumbai Municipal Corporation workers) लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. ८ हजार कंत्राटी कामगार कायम होणार असून, यासोबतच लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू करण्यात येणार असल्याने विविध आस्थापनांतील सुमारे ५० हजार कामगारांना त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचे मनपा प्रशासनासोबत (BMC administration)झालेल्या करारात स्पष्ट झाले.

या ऐतिहासिक विजयाचे नेतृत्व समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील (Sathi Kapil Patil.)यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani)यांच्याअध्यक्षतेखाली काल २७ जुलै रोजी बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांच्याकडे कपिल पाटील यांनी सफाई कामगारांच्या आंदोलनाबाबत रदबदली केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप टळला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांसोबत (BMC Commissioner)कामगार संघटनांच्या दोन बैठका झाल्या. सफाई कामगारांच्या मागण्यांना न्याय देण्याचा मार्ग मोकळा झाला.

म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने या बैठकीत सहभाग घेतला आणि अनेक मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, कोणतेही पद कमी न करता ८ हजार कंत्राटी कामगारांना (8,000 contractual workers) कायम करण्यात येणार आहेत, लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होणार असून त्याचा थेट लाभ ५० हजार कामगारांना (50,000 workers.) मिळणार हे या कराराचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे.या लढ्याच्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी लवकरच भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.