Home / महाराष्ट्र / Parli Vaijnath Bank Elections : वैजनाथ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

Parli Vaijnath Bank Elections : वैजनाथ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

Vaijnath Bank elections Minister Pankaja Munde

बीड – बीडच्या परळी वैजनाथ बँकेच्या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखत १७ पैकी १६ जागा जिंकल्या (winning 16 out of 17 seats). राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तिन्ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला. वैजनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रांवर (36 polling stations) शनिवारी मतदान पार पडले होते.

या निवडणुकीत एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी (43,962 registered voters)१६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण १७ जागांपैकी चार जागा पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde)यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित १३ जागांसाठी मतदान पार पडले.

शरदचंद्र पवार गटाने (Sharadchandra Pawar faction)या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार उभा केला होता. त्यांच्या तिन्ही उमेदवारांपैकी राजाभाऊ फड (Rajabhau Phad) यांना केवळ १,४०७ मते मिळाली. प्रतिस्पर्धी रमेश कराड यांनी तब्बल १४,३१६ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. हा विजय पंकजा मुंडे गटासाठी मोठे राजकीय यश मानले जात आहे.