Home / महाराष्ट्र / IPS Anjana Krishna: ‘त्यानंतर मला…’; अजित पवारांना भिडणाऱ्या अंजना कृष्णांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

IPS Anjana Krishna: ‘त्यानंतर मला…’; अजित पवारांना भिडणाऱ्या अंजना कृष्णांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

IPS Anjana Krishna: गेल्याकाही दिवसांपासून आयपीएस अधिकारी अंजन कृष्णा या चर्चेत आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भिडल्याने याची जोरदार...

By: Team Navakal
IPS Anjana Krishna

IPS Anjana Krishna: गेल्याकाही दिवसांपासून आयपीएस अधिकारी अंजन कृष्णा या चर्चेत आहे. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भिडल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या या तरुण महिला आयपीएस अधिकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कथित वादामुळे एक फिल्मी प्रसंग प्रत्यक्षात घडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजना कृष्णा यांचे नाव देशभरात चर्चेत आले.

आता या घटनेनंतर अंजना यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेमुळे मला अभिनंदनाचे इतके फोन आले की मी भारावून गेलो, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय घडलं?

तहसीलदारांच्या आदेशानंतर आयपीएस अंजना कृष्णा यांनी एका गावातील अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी कारवाई सुरू केली होती. ही कारवाई थांबवण्यासाठी एका स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. फोनवर बोलताना अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे तोंडी आदेश दिले.

मात्र, दुसऱ्याच्या फोनवरून बोलत असल्यामुळे अंजना कृष्णा यांनी थेट अजित पवारांना तुम्ही माझ्या फोनवर संपर्क साधा, असे सांगितले. यानंतर संतापलेल्या अजित पवार यांनी तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला थेट व्हिडिओ कॉल केला आणि उपमुख्यमंत्र्यांना न ओळखण्याची हिम्मत कशी झाली, असे म्हणत खडसावले. अखेरीस, त्यांनी व्हिडिओ कॉलवरच कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

वडिलांची प्रतिक्रिया

या घटनेनंतर अंजना कृष्णा यांचे वडील बीजू कृष्णा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जे काही घडलं त्यामुळे अंजनाची खूप चर्चा झाली, पण ती शांत आहे आणि खुश आहे. ती कामाबद्दल घरी फार काही सांगत नाही. पण या घटनेमुळे मला अभिनंदनाचे इतके फोन आले की मी भारावून गेलो.

माझी मुलगी स्वभावाने शांत आणि हसतमुख आहे. आमच्या घरापासून जवळच मुरूम उत्खनन होत असताना तिने ते पाहिले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध ती उभी राहिली.”, असे ते म्हणाले. अंजना यांचे वडील कपड्यांचा छोटा व्यवसाय करतात, तर त्यांची आई सीमा न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करतात.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा?

अंजना कृष्णा या 2023 च्या बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी असून, सध्या त्या सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (DSP) म्हणून कार्यरत आहेत.

मूळच्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील असलेल्या अंजना यांनी त्यांचे शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल, पूजापुरा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NSS कॉलेजमधून गणित विषयातून BSc पदवी घेतली. नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगून त्यांनी UPSC ची तयारी केली. 2022-23 मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत त्यांनी 355 वा रँक मिळवून यश संपादन केले.


हे देखील वाचा – 

अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती

Nepal Protest: नेपाळमध्ये तरूणाईच्या हिंसाचाराचा भडका! सत्ता पालटली, पंतप्रधान पळाले; संसद ते कोर्ट जाळपोळ

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या