मुंबई – शरद पवार गटाचे (Sharad Pawar faction) जेष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) नेहमी माझ्या संपर्कात असतात, असे वक्तव्य भाजपाचे (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन(GIrish Mahajan) यांनी केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, जयंत पाटील हे पक्षामध्ये फार खुश आहेत असे मला वाटत नाही. कालांतराने बघू यात काय काय बदल होतो. ते नेहमी माझ्या संपर्कात असतात, मात्र याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणे झाले नाही. परिवार विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष शरद पवार गटात सुरु आहे. शिवसेना (ठाकरे गट) तसेच काँग्रेसमध्येसुद्धा आहे. हा संघर्ष आता उफाळून आला आहे. मी माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा जावई यापुढे पक्ष जातच नाही. पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटील यांची माझ्याशी कधी चर्चा झाली नाही. जयंतराव हे मोठे नेते आहेत. त्यांनाकाही बोलायचे असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील. आक्रमक राहण्यासारखे आता विरोधी पक्षांमध्ये काही राहिलेले नाही.