Home / महाराष्ट्र / Kandivali Crime : कांदिवलीत गुंडांची दहशत! वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कांदिवलीतील समतानगरमधील प्रकार

Kandivali Crime : कांदिवलीत गुंडांची दहशत! वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कांदिवलीतील समतानगरमधील प्रकार

Kandivali Crime : मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत झपाटयाने वाढ होत आहे. आणि यामधून गुन्हेगारांना पोलिसांचं कसल्याच प्रकारचं भय...

By: Team Navakal
Kandivali Crime
Social + WhatsApp CTA

Kandivali Crime : मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत झपाटयाने वाढ होत आहे. आणि यामधून गुन्हेगारांना पोलिसांचं कसल्याच प्रकारचं भय राहिलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पण आता मात्र या विकृत गुन्हेगारीची हद्दच पार झाली आहे. मुंबईच्या कांदिवली (Kandivali Crime News) परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला चढवला असलायची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या सगळ्या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उध्दभवताना दिसत आहे.

कांदिवली (Kandivali Crime News) पश्चिममधील एकता नगरमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी सुरू होती. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक कांदिवलीतील एकता नगरमध्ये पोहोचले. दोन गटातील वाद थांबवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असतानाच काही गुंडांनी पोलिसांच्या पथकावरच थेट हल्ला चढवला.

पोलीस अटक करण्यासाठी जात असताना काही गुंड त्यांना सरेआम अडवू लागले. इतकंच नाही, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यात देखील रोखण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना गुंडांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला.

घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती मिळताच आणखी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. एकता नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा अधिक वाढवण्यात आली.


हे देखील वाचा – No Physical And Mental Punishment : शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी; विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यास मनाई..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या