Kapil Sharma Controversy : लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा (Kapil Sharma Show)याच्या नेटफ्लिक्सवरील शोच्या एका भागात अभिनेत्री हुमा कुरेशी हिने मुंबईऐवजी (Mumbai) बॉम्बे असा उल्लेख केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. शोमधील या विधानाचा व्हिडिओ मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS film wing chief Ameya Khopkar)यांनी एक्सवर पोस्ट करत कपिल शर्मा आणि नेटफ्लिक्स (Netflix) दोघांनाही थेट इशारा दिला आहे.
हा व्हिडिओ ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या भागातील असून, यात अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma qureshi)व अभिनेता साकिब सलीम (Actor Saqib Saleem) कपिल शर्मा यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. या संवादादरम्यान हुमा म्हणतात, हा माझा जवळचा मित्र आहे, मी त्याच्याशी काहीही बोलू शकते आणि सांगू शकते. महत्त्वाचे म्हणजे तो मला जज करत नाही.आम्ही बाहेरून आलो आहोत. आम्ही बॉम्बेचे (Bombay)नाही.
#BombaytoMumbai
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 11, 2025
बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत… pic.twitter.com/KKa7TazDJ0
या विधानावरून मनसेने संताप व्यक्त केला आहे. खोपकर म्हणाले की,मुंबईचे अधिकृत नामकरण होऊन तब्बल ३० वर्षे झाली आहेत. पण कपिल शर्मा शोमधील सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकरकडूनआणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होतो. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा. हा विनंतीवजा इशारा आहे.
हे देखील वाचा –
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून आता थेट CRPF ने पाठवले पत्र; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार