Home / महाराष्ट्र / Mumbai Koliwada: मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना प्रभागनिहाय आरक्षण द्या; कोळी महासंघाची मागणी

Mumbai Koliwada: मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना प्रभागनिहाय आरक्षण द्या; कोळी महासंघाची मागणी

Mumbai Koliwada – आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील (Mumbai Koliwada) आद्य मूलनिवासी कोळी समाज व आदिवासी घटकांना प्रभागनिहाय आरक्षण द्यावे,अशी...

By: Team Navakal
Mumbai Koliwada

Mumbai Koliwada – आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील (Mumbai Koliwada) आद्य मूलनिवासी कोळी समाज व आदिवासी घटकांना प्रभागनिहाय आरक्षण द्यावे,अशी मागणी कोळी महासंघाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अशी मागणी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली.

राजहंस टपके म्हणाले की, संविधानानुसार अनुसूचित जाती-जमाती व वंचित घटकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षणाची तरतूद असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कोळी समाजासाठी झालेली नाही. मुंबईतील सर्व ४२ कोळीवाड्यांत असलेले प्रभाग आगामी निवडणुकीत कोळी समाजासाठी आरक्षित करावेत, प्रभाग पुनर्रचना व सीमांकन करताना कोळी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करावा, कोळी व आदिवासी समाजाच्या राजकीय सहभागासाठी जनजागृती व प्रोत्साहन कार्यक्रम राबवावेत, कोळी समाजाला आदिवासी व सांस्कृतिकदृष्ट्या स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देऊन विशेष सकारात्मक कृती लागू करावी अशा या आमच्या कोळी महासंघाच्या मागण्या आहेत. मुंबईतील कोळीवाड्यांना केंद्रस्थानी ठेवून आरक्षण लागू केल्यास कोळी समाजाला न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल आणि लोकशाही व्यवस्थेत मूळ भूमिपुत्रांचा सन्मानपूर्वक सहभाग निश्चित होईल, हे संविधानाच्या आत्म्यास साजेसे पाऊल ठरेल, असे महासंघाचे मत आहे.


हे देखील वाचा –

हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर उमर खालीदची सुप्रीम कोर्टात धाव! पाच वर्षांपासून जामिनाविना तुरुंगातच

शाहरुख-दीपिकाला कोर्टात दिलासा ह्युंदाई कारप्रकरणी चौकशी स्थगित

कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे उल्लेख ! मनसे आक्रमक

Web Title:
संबंधित बातम्या