Kunal Kamra Controversy | कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर वादात अडकला होता. शिंदे यांचा गाण्यातून गद्दार असा उल्लेख केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शो झाला त्या ठिकाणी जाऊन तोडफोड देखील केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराची औकात नसल्याचे म्हणत निशाणा साधला. यावर कुणाल कामराने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
प्रकरण काय?
एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना कुणाल कामराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना फडणवीस यांनीकुणाल कामरासारख्या लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य असल्याचे म्हटले होते. अशा लोकांची औकात नाही, तुम्ही त्यांची औकात वाढवता, असे म्हटले होते. फडणवीस यांचे हे वक्तव्य चर्चेत आल्यानंतर आता कुणाल कामराने ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
माझी काही औकात नसेल, तर माझ्याकडे दुर्लक्ष करा, असे म्हणत लवकरच मुंबईत शो करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
Hello @Dev_Fadnavis you’re right,
— Kunal Kamra (@kunalkamra88) May 29, 2025
Politically it’s better to ignore me.
I have no Aukad & only 4 people watch my show. Please can I be ignored?
October I was planning shows in
Thane – New Mumbai – Mumbai –
Pune – Nasik – Nagpur – Aurangabad
Please coordinate with Mr Shinde… pic.twitter.com/1yyho9Wtef
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर कुणाल कामराने एक्स (X) अकाउंटवरून ट्विट करत त्यांना थेट उत्तर दिले. कुणाल कामरा म्हणाले की, “माझी औकात नसेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला तुम्ही का सांगत नाही? माझा शो जर चार लोकही बघत नसतील तर माझ्याकडे दुर्लक्ष का करत नाही?
ऑक्टोबर महिन्यात मी नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शो घेणार आहे. तुम्ही माझ्याबाबत जे बोललात ते योग्यच होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगता आलं तर बघा,” असे कुणाल कामराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कुणाल कामराच्या या पोस्टमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.