लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी जमा होणार ? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana June installment

Ladki Bahin Yojana June installment | महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana June installment ) पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये (Aadhaar-linked Accounts) जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर ही माहिती जाहीर केली. निधीच्या कमतरतेमुळे जूनच्या हप्त्याला थोडा विलंब झाला होता, पण महायुती सरकारने 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वळवण्यास मंजुरी दिल्याने आता वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे.

आदिती तटकरे यांनी सांगितले की, सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, पात्र महिलांच्या आधार संलग्न खात्यांमध्ये निधी (जमा होईल. “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील महिलांचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे,” असे तटकरे यांनी नमूद केले.

येत्या 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील. महिलांनी आपल्या बँक खात्यातील व्यवहार तपासून पैसे जमा झाले आहेत की नाही, हे पाहावे.

महाराष्ट्र सरकारने योजनेतून 2,289 अपात्र महिला वगळल्या आहेत, ज्या सरकारी कर्मचारी (Government Employees) असल्याचे आढळले. दरम्यान महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते देण्यात आले आहेत.