महादेव मुंडे यांच्या पत्नीचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

Mahadev Munde's wife threatens to commit self-immolation with family

बीड – बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde Murder) यांची २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालय परिसरात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने, त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षकांची (Police Superintendent) भेट घेतली. यावेळी त्यांनी आठ दिवसात आरोपीला अटक झाली नाही नंतर कुटुंबासह आत्मदहन करणार, असा इशारा त्यांनी दिला.

या हत्येमागे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात असल्याचा दावा कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर याने केला. यानंतर या प्रकरणात केज पोलिसांनी ५ जुलैला बाळा बांगरांची सहा तास चौकशी केली. याबाबत माहिती घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली.

या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, मागच्या वेळेस पोलीस अधीक्षकांनी सांगितले होते की, साक्षीदार किंवा ठोस पुरावे मिळाले तर आरोपींना अटक करू. बाळा बांगरने खुल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती दिली आहे. त्यामुळे चौकशी होणे गरजेचे आहे. तो खरे बोलत असेल तर त्याची साक्ष ग्राह्य धरण्यात यावी. स्थानिक पोलिसांवर दबाव असल्याने आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा. आठ दिवसांत आरोपीला अटक न झाल्यास आम्ही आत्मदहन करू.