Home / महाराष्ट्र / HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख काय आहे? जाणून घ्या

HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख काय आहे? जाणून घ्या

Maharashtra HSRP Number Plate Last Date

Maharashtra HSRP Number Plate Last Date: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (Maharashtra HSRP Number Plate Last Date) लावण्याची अंतिम मुदत महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. परिवहन विभागाने) याआधी दिलेली 15 ऑगस्टची अंतिम मुदत आता नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवली आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट (Maharashtra HSRP Number Plate Last Date) नाही, त्यांची नोंदणी, पत्ता बदलणे किंवा कर्जाची नोंद करणे यांसारख्या कामांवर आता निर्बंध लावले जाणार आहेत. तसेच, ‘वायुवेग पथकाने’ जप्त केलेली वाहने एचएसआरपी प्लेट लावल्याशिवाय सोडली जाणार नाहीत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

चौथ्यांदा मुदतवाढ

याआधी एचआरएसपी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट होती. पण आता यात वाढ करून ही मुदत 30 नोव्हेंबर 2025 करण्यात आली आहे.

एप्रिल 1, 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या 2.10 कोटींपेक्षा जास्त वाहनांना एचएसआरपी प्लेट्स लावणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 68 लाख अपॉइंटमेंट बुक झाल्या आहेत, आणि त्यापैकी फक्त 47 लाख वाहनांवर नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत.

परिवहन विभागाच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी वाहनचालकांनी केल्या होत्या. यामुळे अनेकजण अपॉइंटमेंट बुक करू शकले नाहीत. मात्र, आता पुन्हा एकदा नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, या तारखेनंतरही एचआरएसपी नंबर प्लेट न लावल्यास वाहनचालकांवर कारवाई होऊ शकते.

Share:

More Posts