Home / महाराष्ट्र / कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? जाणून घ्या प्रोसेस

कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? जाणून घ्या प्रोसेस

Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate: मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार अर्ज करणाऱ्या कोणत्याही अर्जदाराला प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अर्जाची प्रक्रिया

अर्जदारांनी सर्वप्रथम ‘आपले सरकार पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) द्वारे अर्ज ऑनलाइन सादर करावा. अर्ज पूर्ण झाल्यावर, त्याची प्रिंट काढून संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीचे जुने रेकॉर्ड, जसे की 7/12 किंवा 8-A चा उतारा
  • ‘कुणबी’ असा उल्लेख असलेले जुने सरकारी दाखले
  • वंशावळ किंवा कौटुंबिक इतिहास दर्शवणारे दस्तऐवज
  • शाळा सोडल्याचा दाखला, ज्यात ‘कुणबी’ जात नोंद आहे
  • पालक किंवा आजोबांच्या नावावर असलेले जुने जात प्रमाणपत्र

प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, ज्या अर्जदारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

तपासणी प्रक्रिया

तहसीलदारांच्या कार्यालयातील एक समिती सुरुवातीला अर्जाची प्राथमिक चौकशी करेल. माहिती योग्य आढळल्यास, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र जारी केले जाईल. कोणत्याही माहितीमध्ये विसंगती आढळल्यास अर्जदाराला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले जाईल.

यासोबतच प्रशासनाने खोटे दस्तऐवज सादर करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बनावट पुरावे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेल्या भारतातील पहिल्या टेस्ला कारची किंमत किती? काय आहे खास? जाणून घ्या

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड

जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित