पावसाचा कहर! लोणावळ्यात 24 तासांत 233 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon | यंदा मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. नेहमीपेक्षा तब्बल 10 दिवस आधी, राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून, अनेक भागांत मुसळधार पावसाने (heavy rainfall) जोरदार हजेरी लावली आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात एकाच दिवसात विक्रमी पाऊस झाला आहे 25 मे रोजी, लोणावळा (Lonavala) शहरात अवघ्या 24 तासांत 233 मिमी (9.17 इंच) पावसाची नोंद झाली. ही नोंद यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वात जास्त आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात गंभीर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गवळीवाडा (Gavliwada) परिसरात पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने काही कुटुंबांना तात्पुरते ठिकाण बदलावे लागले. शहरातील अनेक मुख्य रस्ते जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी, नैऋत्य मान्सून जूनच्या नियोजित वेळेच्या आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई करत, साचलेलं पाणी उपसण्याचं आणि रस्ते मोकळे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे.