महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक सभागृहात सादर

Maharashtra Special Public Safety Bill introduced in the House

मुंबई- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या चर्चेमुळे वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेत (Legislative Assembly) सादर केले. देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले आहे. विधिमंडळाच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी ते सभागृहात मांडले. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे सरकारने हे विघेयक मांडताना त्यातील काही तरतुदी सौम्य केल्या.

नक्षलवाद कायमचा संपवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या विधेयकामुळे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, असा आरोप करत विरोधकांसह अनेक पत्रकार संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता. विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक काल विधिमंडळात सादर करण्यात आले. या विधेयकावर सखोल विचार करण्यासाठी विधानपरिषद व विधानसभेच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आले. समितीने आतापर्यंत पाच बैठकांचे आयोजन केले. त्यामध्ये विधेयकाविषयी निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आले. तसेच, जनतेकडून आलेल्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. विधीमंडळ सचिवालयाने जनतेकडून तब्बल १२,५०० हून अधिक सूचना स्वीकारल्या असून, त्याआधारे विधेयकात आवश्यक सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.