Maharashtra SSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल यावर्षी उद्या (13 मे) जाहीर करण्याची शक्यता आहे.
बोर्डाकडून काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी आता दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. दहावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निकाल कुठे पाहायचा, गुणपत्रिका कशी डाउनलोड करायची याविषयी जाणून घेऊया.
महाराष्ट्र SSC इयत्ता दहावीचा निकाल 2025 कधी?
दहावीचा निकाल उद्या 13 मे ला जाहीर केला जाईल. कारण आज (12 मे) बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. राज्याच्या इतिहासात SSC चा निकाल सर्वात लवकर जाहीर होण्याची ही शक्यता आहे, कारण यावर्षी परीक्षा देखील नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आली होती.
महाराष्ट्र SSC इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षांमध्ये, 2024 आणि 2023 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाने SSC इयत्ता दहावीचा निकाल अनुक्रमे 27 मे आणि 2 जून रोजी जाहीर केला होता.
महाराष्ट्र SSC इयत्ता दहावीचा निकाल 2025: कुठे पाहायचा?
दहावी बोर्डाचे विद्यार्थी त्यांच्या 2025 च्या SSC परीक्षेचा निकाल खालील वेबसाइट्सवर पाहू शकतात:
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in
दहावीचा निकाल कसा चेक कराल?
- mahahsscboard.in या महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटच्या होमपेजवर, Maharashtra SSC Result 2025 च्या लिंकवर क्लिक करा.
- तुम्हाला एका नवीन पानावर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे तुम्ही तुमची लॉगिन माहिती (नाव, हॉल तिकीट क्रमांक इ.) भरून सबमिट बटणावर क्लिक करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा दहावीचा SSC निकाल ऑनलाइन पाहता येईल. तुम्ही ही गुणपत्रिका डाउनलोड करू शकता.