नापणे धबधब्यावर उभारला ! राज्यातील पहिला काचेचा पूल

Maharashtra’s First ‘Glass Bridge’ Built Over Napane Waterfall

सिंधुदुर्ग – वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर (Napane Waterfall in Vaibhavwadi taluka)महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल (first glass bridge)उभारण्यात आला आहे. पर्यटनमंत्री नितेश राणे (Tourism Minister Nitesh Rane) यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून हा पूल आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे.

नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेला हा काचेचा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा (attraction) केंद्रबिंदू ठरत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात नेहमीच चांगला पाऊस (rainfall)पडतो.त्यामुळे तेथील सौंदर्य बहरताना दिसते. पावसाळ्यात धबधब्याचे अद्भुत दृश्य जवळून अनुभवण्याची संधी या पुलामुळे पर्यटकांना मिळणार आहे.‘सिंधुरत्न’ योजनेतून हा पूल सुमारे ९९.६३ लाख रुपये (cost of approximately ₹99.63 lakh.)खर्चून उभारण्यात आला आहे.या पुलाचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातूनही टिपण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी पर्यटन मंत्री नितेश राणे म्हणाले की,या धबधब्यावरील उर्वरित सोयीसुविधा या नापणे,शेर्पे व नाधवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, हॉटेल, दिशादर्शक फलक या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील