नांदेड: महिन्यापूर्वीच बांधलेला रस्ता, तरूणाने थेट हातानेच उखडले डांबर; व्हिडिओ व्हायरल

Nanded Road Viral Video

Nanded Road Viral Video | वीज, पाणी, रस्ते सारख्या मुलभूत गोष्टी चांगल्या असाव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी असते. मात्र, अनेक भागांमध्ये या मुलभूत गोष्टी देखील उपलब्ध होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये आजही चांगले रस्ते नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, बांधलेले रस्ते देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

असाच एक नांदेड जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल होत असून, यात एक तरूण हाताने रस्त्याचे डांबर उखडत असल्याचे पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात अवघ्या एका महिन्यापूर्वी बांधलेला डांबरी रस्ता एका तरुणाने हाताने उखडून दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही दिवसांपूर्वीच बांधलेला रस्ता तरूण सहजपणे हाताने उखडून टाकत आहे. हा तरूण व्हिडिओमध्ये ‘या रस्त्याचा दर्जा पाहा. या तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळणार का?’, असा सवाल करताना दिसत आहे.यावरून रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई होणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.