लाडक्या ‘महादेवी’ हत्तीणीसाठी कराडमध्येही स्वाक्षरी व मोर्चा

March in Karad for Mahadevi Elephant

कराड – कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील (Nandani Math) माधुरी (Madhuri) ऊर्फ महादेवी (Mahadevi) हत्तीणीला गुजरातच्या (Gujarat) वनतारामध्ये (Vantara) नेले आहे. या हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम (signature campaign) घेण्यात आली. आज मोर्चा काढण्याचाही निर्णय झाला. कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कराड (Karad) मध्येही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

शहरातील दत्त चौकात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कराडकर एकवटले होते.यावेळी चौकातील फलकावर कराडकरांनी स्वाक्षरी करून कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला.नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ (Peta) ने केला.हे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. हत्तीणीची पाहणी करून समितीने अहवाल सादर केला होता. तिच्या पायाला झालेली जखम बरी होत नव्हती . हे सर्व पाहून समितीने प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवले होते.याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्यावतीने महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती,मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.परंतु गेल्या ३५ वर्षापासून महादेवी आणि कोल्हापूरकरांचा एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे. कराडमध्ये कोल्हापूरकरांच्या याच पार्श्वभूमीवर पाठिंबा देत सह्यांची मोहीम राबविण्यात आली व मोर्चा काढण्यात आला.