Home / महाराष्ट्र / नागपूरमध्येही १५ ऑगस्टला मांसविक्री बंद! विरोधकांची टीका

नागपूरमध्येही १५ ऑगस्टला मांसविक्री बंद! विरोधकांची टीका

Meat Sales Ban in Nagpur on August 15

नागपूर – कल्याण-डोंबिवली महापालिकेनंतर (KDMC)आता नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation)हद्दीतील चिकन आणि मटण दुकाने (chicken and mutton shops closed)१५ ऑगस्टला बंद राहणार आहेत. शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दुकाने बंद ठेवण्यासाठी मनपा लवकरच नोटीस (notices) पाठवणार आहे. या निर्णयावर उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे.

पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चालकांना १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या जाणार आहेत. शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेत मनपाने हा आदेश जारी करण्याची तयारी केली आहे.

यावर शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad)म्हणाले की, सरकार मांसविक्रीवर बंदी का करत आहे? कोणी काय खावे किंवा न खावे, हे शासन का ठरवत आहे? सरकारला फक्त वाद वाढवायचा आहे. नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सरकार असे निर्णय घेत आहे.

उबाठा नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)म्हणल्या की, आम्ही शाकाहार करायचा की मांसाहार (non-vegetarian), हे प्रशासन (administration) का सांगणार? राज्य सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की सतत धार्मिक कार्ड (religious card)खेळण्यासाठी, हे समजत नाही. महत्त्वाचे प्रश्न असताना सरकार खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी आणत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तरी नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्याचा (freedom)उपभोग घेऊ द्या.