Home / महाराष्ट्र / Mithi River : मिठी नदी प्रकल्पाच्या खर्चात चौथ्यांदा कपात

Mithi River : मिठी नदी प्रकल्पाच्या खर्चात चौथ्यांदा कपात

Mithi River : मिठी नदी (Mithi River) पुनरुज्जीवन प्रकल्पातील पॅकेज ३ साठी आता चौथ्यांदा खर्चात कपात करून मुंबई महापालिकेने (BMC)...

By: Team Navakal
Mithi River

Mithi River : मिठी नदी (Mithi River) पुनरुज्जीवन प्रकल्पातील पॅकेज ३ साठी आता चौथ्यांदा खर्चात कपात करून मुंबई महापालिकेने (BMC) निविदा काढली आहे. याआधी बोली लावण्यास कंत्राटदारां (Contractor)च्या अनुत्सुकतेमुळे ही निविदा प्रक्रिया अपयशी ठरली. आता अवघ्या सहा महिन्यांतच ही फेरनिविदा काढण्यात आली आहे.

यावेळी महापालिकेने अंदाजे खर्च २,३९४ कोटी रुपयांवरून १,७०० कोटी रुपयांपर्यंत खाली आणला आहे. नवीन निविदेत कामाचा व्याप कमी करताना काही महत्त्वाच्या बाबी वगळण्यात आल्या आहेत. ८,८५० मीटर लांबीचा प्रस्तावित प्रॉमनेड आणि सुशोभीकरणाची कामे रद्द करण्यात आली आहेत. पूर नियंत्रणासाठी असलेल्या फ्लडगेट्सची संख्या २५ वरून १८ वर आणली आहे.

पहिल्यांदा या प्रकल्पासाठीची निविदा मार्च २०२३ मध्ये पुनर्वसन प्रश्नावरून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित निविदाही यशस्वी झाली नाही. मार्च २०२५ मध्ये सल्लागार नेमून पुन्हा निविदा काढण्यात आली, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यंदाच्या मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि सायन परिसरात पाणी साचले आणि १८ ऑगस्टला रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे पालिकेने प्रकल्पाला गती देण्यासाठी खर्चकपातीचा निर्णय घेतला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की सीएसएमटी पूल ते माहीम खाडी यादरम्यान पूर नियंत्रणासाठी ही निविदा काढण्यात आली आहे. मात्र, यातून प्रॉमनेड, सायकल ट्रॅक आणि वॉकवे यांचे नियोजन वगळण्यात आले आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कपिल देव यांच्यावरील मॅचफिक्सिंगची फाइल का बंद ?

भारतावरील टॅरिफ योग्य’; अमेरिकेच्या अतिरिक्त कर लावण्याच्या धोरणाला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा

Bigg Boss 19’ मध्ये होणार अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री?

 

Web Title:
संबंधित बातम्या