Home / महाराष्ट्र / MNS Women Kurla : मनसेत अंतर्गत कुरघोडी; मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कुर्ल्यातील महिला कार्यकर्त्या आक्रमक

MNS Women Kurla : मनसेत अंतर्गत कुरघोडी; मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कुर्ल्यातील महिला कार्यकर्त्या आक्रमक

MNS Women Kurla : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच आता मनसेमध्ये आपसातच वाद...

By: Team Navakal
MNS Women Kurla
Social + WhatsApp CTA

MNS Women Kurla : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच आता मनसेमध्ये आपसातच वाद असल्याचे दिसून येत आहे. कुर्ला येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) विभागाध्यक्षाने महिला कार्यकर्त्यांचे फोटो व्हायरल केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे मनसेतील राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालं आहे.

या प्रकाराविरोधात आज कुर्ल्यातील मनसेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्याच दिसून येत आहे. त्यांनी शिवतीर्थ येथे मोर्चा काढत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची मागणी केली.

कुर्ल्यातील विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत महिलांचे फोटो व्हायरल केल्याचे गंभीर आरोप मनसेच्या महिला आंदोलकांनी केला आहे. या प्रकारामुळे महिलांचा मानसिक छळ होत असल्याचे देखील बोलले जात आहे. शिवाय या सगळ्या प्रकारामुळे पक्षाची राजकीय प्रतिमाही मलिन होत आहे.

विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे, महेंद्र शिंदे आणि सुलोचना कदम यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मनसेचे नाव खराब करणाऱ्या व्यक्तींना पदावर ठेवू नये अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.


हे देखील वाचा – Gen-Z Post Office : डिजिटल पिढीसाठी खास मुंबईतले पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस; उद्या होणार उद्घाटन

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या