मुंबई – उबाठाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane,)यांच्या विरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको, अशी मागणी नितेश राणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याबाबत केलेल्या कथित अपमानास्पद विधानांवरून माझगाव न्यायालयात खटला (defamation case) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नितेश राणे न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी (non-bailable warrant)करण्यात आले होते. मात्र, राणे यांनी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आश्वासन दिल्याने दंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी (cancelled by Magistrate A. A. Kulkarni) हे वॉरंट रद्द केले. त्यानुसार आज ते माझगाव न्यायालयात हजर झाले.
यावेळी त्यांच्या वकिलांनी खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे (current judge)ऐवजी दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती (requested)केली. मात्र, या विनंतीमागचे कोणतेही ठोस कारण त्यांच्या वकिलांकडून न्यायालयासमोर मांडले गेले नाही. त्यामुळे न्यायालयाने सध्या तरी खटल्याची सुनावणी आपल्याच समोर सुरू राहील, असे स्पष्ट केले. राणे काही दिवस बाहेरगावी जाणार असल्यामुळे पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी घेण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली होती. न्यायालयाने ती मंजूर करत पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.