Home / महाराष्ट्र / ‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार,...

By: Team Navakal
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो महिला डोळे लावून बसल्या होत्या. आता या सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून (11 सप्टेंबर) सुरू झाली आहे. यासाठी तब्बल 344 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांची ‘एक्स’वर पोस्ट

या संदर्भात स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली. यात त्या म्हणाल्या, या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे.” लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने या योजनेतील रक्कम 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत विचारले असता मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, नवीन अर्थसंकल्पात यावर सकारात्मक विचार केला जाईल, पण सध्या तरी महिलांना1500 रुपयांचाच लाभ मिळेल.

असे तपासा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा 14 वा हप्ता असून, आतापर्यंत एकूण 13 हप्त्यांत ₹19,500 जमा झाले आहेत. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही खालीलप्रमाणे तपासू शकता:

  • बँकेच्या एसएमएस (SMS) सेवेद्वारे.
  • बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन.
  • Net Banking, Google Pay किंवा PhonePe ॲपद्वारे.
  • एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासून.
  • बँकेत प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून.

दरम्यान, या योजनेच्या 2 कोटी 48 लाख महिला लाभार्थी आहेत, ज्यापैकी काही अर्ज निकषांच्या बाहेर असल्यामुळे बाद करण्यात आले आहेत.


हे देखील वाचा –

Charlie Kirk Death: चार्ली कर्क यांची अमेरिकेत हत्या, पण धक्का ट्रम्प यांना; असं का?

Web Title:
संबंधित बातम्या