Home / महाराष्ट्र / BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची मोठी रणनीती; काँग्रेसची साथ सोडून ‘या’ पक्षासोबत जाणार?

BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची मोठी रणनीती; काँग्रेसची साथ सोडून ‘या’ पक्षासोबत जाणार?

BMC Election NCP Sharad Pawar Alliance : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्या आणि...

By: Team Navakal
BMC Election NCP Sharad Pawar Alliance
Social + WhatsApp CTA

BMC Election NCP Sharad Pawar Alliance : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्या आणि युती निश्चित करण्यासाठी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी मुंबईतील 122 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून 21 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत अंतिम चर्चेची फेरी पार पडणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने आम्हाला सोबत घ्यावे अशी आमची इच्छा आहे, मात्र तसे न झाल्यास जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी म्हणून लढताना जागावाटपात सन्मानजनक तोडगा निघावा आणि एकमेकांच्या हक्काच्या जागा अडवू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पक्षातील नेत्यांचा कल मनसे आणि उद्धव सेनेकडे

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. यामध्ये मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एक रंजक बाब समोर आली आहे. पक्षातील बहुतांश नेत्यांच्या मते, मुंबईत काँग्रेसची साथ सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासोबत निवडणूक लढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

लोकसभेप्रमाणेच कमी जागा लढवून अधिक यश मिळवण्याचा प्रयत्न पक्षाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत किमान 50 जागांची मागणी करण्याची शक्यता असून पूर्व उपनगरातील आपल्या ताकदीच्या जोरावर 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. 2017 च्या निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते, ती संख्या यावेळी वाढवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

मुंबईत नवी समीकरणे आणि शिवसंग्रामची एन्ट्री

दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेसोबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून आज यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस सध्या मुंबईत स्वबळाच्या भूमिकेत दिसत असताना शरद पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीने मालवणी, धारावी, वांद्रे, कुर्ला, शिवाजीनगर मानखुर्द यांसारख्या मुस्लिम बहुल आणि आपल्या प्रभावाखालील जागांची मागणी केली आहे. याच दरम्यान विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षानेही मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी महानगरपालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. ज्योती मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम ज्या प्रभागात प्रबळ आहे, तिथे आपले उमेदवार उभे करणार आहे. यामुळे मुंबईतील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

हे देखील वाचा – Anjali Damania: … तर फडणवीसांना कधीही माफ करणार नाही; अंजली दमानिया यांचा कडाडून विरोध

Web Title:
संबंधित बातम्या