Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्यानंतर, आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील चौकाला ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गंगापूर शेतकरी कृती समितीने या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला निवेदन दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 15 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. मागील आठवड्यात CSMT, आझाद मैदान आणि महानगरपालिका चौकात मराठा समाजाने आंदोलन केले होते.
जरांगे पाटील यांनी पाच दिवस अन्नपाण्याचा त्याग करत आझाद मैदानात आमरण उपोषण केले. त्यांच्या या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात मराठा समाजाने जल्लोष केला.
या ऐतिहासिक लढ्यानंतर आता गंगापूर शेतकरी कृती समितीने CSMT चौकाला ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असे नाव देण्याची मागणी केली आहे.
या चौकाला ऐतिहासिक महत्त्व असून, दररोज लाखो लोक येथून प्रवास करतात. त्यामुळे, या चौकाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव दिल्यास मराठा, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे समितीचे म्हणणे आहे. या निवेदनावर राहुल पाटील ढोले, महेशभाई गुजर, अण्णासाहेब जाधव, योगेश पाटेकर आणि सार्थक पाटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
सार्वजनिक बँकांमध्ये मोठे बदल होणार? अर्थ मंत्रालय आयोजित करणार ‘PSB मंथन’
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड