Home / महाराष्ट्र / मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी रेड अलर्ट, विक्रोळीत दरड कोसळून 2 ठार

मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी रेड अलर्ट, विक्रोळीत दरड कोसळून 2 ठार

Mumbai Rains Red Alert

Mumbai Rains Red Alert: आज (16 ऑगस्ट) सकाळपासून मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra Weather) इतर भागांमध्ये मुसळधार पावसानेजोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी ‘रेड अलर्ट’ (Red alert) जारी केला आहे, तर नाशिक, पुणे, सातारा, जळगाव आणि गडचिरोलीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange alert) देण्यात आला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेअसून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवे, कुर्ला, चेंबूर, गांधी मार्केट, किंग्स सर्कल यांसारख्या सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

विक्रोळीत दरड कोसळून दुर्घटना

मुसळधार पावसामुळे मुंबईतील विक्रोळीभागातील वर्षा नगरमध्ये दरड कोसळण्याचीघटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास डोंगरावरून मातीचा ढिगारा एका घरावर कोसळला. यात एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हवामानाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

  • मुंबई: आज दिवसभर अतिशय जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
  • इतर जिल्हे: कोल्हापूर, अमरावती, वर्धा आणि नागपूरसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडेल, तर कोकण आणि गोवा परिसरात जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.