पहिले आयकॉनिक मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू;, दरवर्षी 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता; पाहा वैशिष्ट्ये

Mumbai Cruise Terminal

Mumbai Cruise Terminal | मुंबई बंदरावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये (Cruise terminal) प्रवासी जलवाहतुकीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आले आहे. क्रूझ टर्मिनलचे लोकार्पण केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांच्या हस्ते झाला. यावेळी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात आले.

हे नवीन क्रूझ टर्मिनल (Cruise tourism) ‘क्रूझ भारत मिशन’ (Cruise India Mission) अंतर्गत विकसित करण्यात आले असून, मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरात 4,15,000 चौरस फूट क्षेत्रात हे उभे करण्यात आले आहे. भारतातील हे सर्वात मोठे जागतिक दर्जाचे टर्मिनल ठरणार असून, दररोज 10,000 प्रवासी व दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता यात आहे.

टर्मिनलमध्ये 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर, एकाच वेळी 5 क्रूझ जहाजांना थांबण्याची सुविधा, 11 मीटर खोलीचा आणि 300 मीटर लांबीचा धक्का, तसेच 300 पेक्षा जास्त वाहने ठेवता येतील असा बहुस्तरीय वाहनतळ उभारण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 556 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत.

या उद्घाटन सोहळ्यात बोलताना सोनोवाल म्हणाले, “मुंबईचा सागरी इतिहास आणि व्यवसाय हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘भारत हा जागतिक क्रूझ हब व्हावा’ हे स्वप्न या टर्मिनलच्या माध्यमातून साकार होत आहे.”

या कार्यक्रमात वाढवण बंदरातील 5700 कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांबाबत तीन महत्त्वाचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. यात 4200 कोटींच्या गुंतवणुकीसह कंटेनर, बल्क आणि लिक्विड कार्गो टर्मिनल, 1000 कोटींच्या बल्क लिक्विड टर्मिनलची उभारणी आणि 500 कोटी रुपयांत 3,00,000 सीबीएम क्षमतेची द्रव कार्गो जेट्टी व टँक फार्मची उभारणी यांचा समावेश आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा समावेश ‘क्रूझ भारत मिशन’मध्ये असून, 2029 पर्यंत देशात 10 आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल्स, 100 नदी टर्मिनल्स, 5 मरीनाज, 500 किमी जलमार्गांचं एकत्रीकरण, 10 दशलक्ष समुद्री प्रवासी आणि 1.5 दशलक्ष नदी प्रवासी यांसह 4 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य आहे.

Share:

More Posts