Mumbai Luxury Real Estate | मुंबईतील आलिशान रिअल इस्टेट बाजारात आणखी एक विक्रमी व्यवहार नोंदवला गेला आहे. वरळी सी फेसवर (Worli Sea Face) असलेल्या ‘Naman Jana’ या प्रोजेक्टमधील एक डुप्लेक्स अपार्टमेंटची तब्बल 639 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. ही डील आतापर्यंतच्या भारतातील सर्वात महागड्या निवासी प्रॉपर्टीमध्ये गणली जात आहे.
या अपार्टमेंटची खरेदी यूएसव्ही इंडियाच्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी (Leena Gandhi) यांनी केली आहे. ही 40 मजली इमारत 22,572 चौरस फूट कार्पेट एरियावर पसरलेली आहे. यूएसव्ही इंडिया ही फार्मा आणि बायोटेक कंपनी देशातील टॉप कंपन्यांपैकी एक मानली जाते.
अपार्टमेंटची किंमत आणि विशेष बाबी
तिवारी यांनी 32 व्या ते 35 व्या मजल्यांवरील दोन अल्ट्रा-लक्झरी युनिट्स सुमारे 2.83 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केली आहेत. याचे रजिस्ट्रेशन नुकतेच झाले असून स्टॅम्प ड्युटी आणि GST मिळून एकूण 63.9 कोटींहून अधिक रक्कम भरल्याची नोंद आहे.
या व्यवहारामुळे वरळीतील प्रीमियम हाउसिंग रिअल इस्टेटची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत लीना गांधी तिवारी?
लीना गांधी तिवारी या USV प्रायव्हेट लिमिटेडच्या (USV Private Limited) संस्थापक विठ्ठल गांधी यांच्यां नात आहेत. 1961 मध्ये रेवलॉन (Revlon) कंपनीसोबत भागीदारी करून ही औषध निर्माण कंपनी स्थापन करण्यात आली होती. . आज ही कंपनी देशातील एक प्रमुख औषध आणि बायो-टेक्नोलॉजी कंपनी (bio-technology company) आहे.
फॉर्ब्सनुसार, त्यांची संपत्ती 3.9 अब्ज डॉलर इतकी आहे. त्या जगातील 964 व्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असून भारतातील टॉप महिला उद्योजकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या संपत्तीने किरण मजूमदार-शॉ आणि फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनाही मागे टाकले आहे.