Home / महाराष्ट्र / Municipal Corporation Election 2025 : महापालिका निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर; आजपासूनच लागणार आचारसंहिता?राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Municipal Corporation Election 2025 : महापालिका निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर; आजपासूनच लागणार आचारसंहिता?राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Municipal Corporation Election 2025 : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अनेक बदल राज्याच्या राजकारणात झपाट्याने होताना दिसत आहेत आता अशातच राज्य निवडणूक आयोगाची...

By: Team Navakal
Municipal Corporation Election 2025
Social + WhatsApp CTA

Municipal Corporation Election 2025 : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अनेक बदल राज्याच्या राजकारणात झपाट्याने होताना दिसत आहेत आता अशातच राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद (State Election Commission Maharashtra) पार पडणार आहे. हि पत्रकार परिषद संध्याकाळी ४ वाजता सुमारास सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून (Municipal Corporation Election 2025) आज घोषणा होणार का अश्या चर्चा देखील रंगल्या आहेत. कालच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. त्यानंतर आज लगेचच राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यामुळे महानगपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याच पार्शवभूमीवर राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागणार का? ह्या सगळ्याप्रश्नाची उत्तर आजच्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत.

Zilla Parishad Election: कोणत्या जिल्हा परिषद निवडणूक होणार?
धुळे
नंदुरबार
नाशिक
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
ठाणे
अहिल्यानगर
कोल्हापूर
पुणे
सांगली
सातारा
सोलापूर
छ.संभाजीनगर
बीड
हिंगोली
जालना
लातूर
नांदेड
धाराशिव
परभणी
अकोला
अमरावती
बुलढाणा
चंद्रपूर
गडचिरोली
जळगाव
नागपूर
वर्धा
वाशिम
यवतमाळ

कोणत्या २९ महापालिकेची निवडणूक बाकी? (Municipal Corporation Election 2025)
१. अहिल्यानगर महानगरपालिका
२. अकोला महानगरपालिका
३. अमरावती महानगरपालिका
४. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
५. बृहन्मुंबई महानगरपालिका
६. चंद्रपूर महानगरपालिका
७. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८. धुळे महानगरपालिका
९. इचलकरंजी महानगरपालिका
१०. जळगाव महानगरपालिका
११. जालना महानगरपालिका
१२. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
१३. कोल्हापूर महानगरपालिका
१४. लातूर महानगरपालिका
१५. मालेगाव महानगरपालिका
१६. मीरा भाईंदर महानगरपालिका
१७. नागपूर महानगरपालिका
१८. नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९. नाशिक महानगरपालिका
२०. नवी मुंबई महानगरपालिका
२१. पनवेल महानगरपालिका
२२. परभणी महानगरपालिका
२३. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२४. पुणे महानगरपालिका
२५. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
२६. सोलापूर महानगरपालिका
२७. ठाणे महानगरपालिका
२८. उल्हासनगर महानगरपालिका
२९. वसई विरार महानगरपालिका


हे देखील वाचा – Jio Recharge Plans : Jio ची ‘Happy New Year 2026’ ऑफर! जबरदस्त फायद्यांसह 3 नवीन स्वस्त प्लॅन लाँच

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या