धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीविरोधात ४४२ तक्रारी

Windmill Company

धाराशिव– धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. सिरेंटिका पवनचक्की कंपनीच्या (Serentica windmill company) ठेकेदारांविरोधात आतापर्यंत तब्बल ४४२ तक्रारी दाखल (442 Complaints Filed) करण्यात आल्या असून, सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक (fraud) झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या ठेकेदारांनी शेतजमिनीवर टॉवर उभारण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers)मोबदला देण्याचे आश्वासन देत धनादेश दिले. पण १५ शेतकऱ्यांचे धनादेश वठलेच नाहीत. शेतकऱ्यांनी याबाबत तहसील कार्यालयात तक्रारी दाखल केली असून, वाशी तालुक्यातील पारा गावातील १५ शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे याबाबत निवेदन दिले. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, संबंधित ठेकेदार फोनही उचलत नाही आणि चेक होल्ड करून फसवणूक करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तांदळवाडी येथे सातव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले आहे. या उपोषणात सहभागी असलेल्या ८ शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनी आणि ठेकेदारांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.