Navi Mumbai Airport : लोकनेते दि.बा. पाटील (D.B. Patil) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी रविवार १४ सप्टेंबर रोजी दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) नामकरण प्रलंबित प्रश्नासाठी व भूमिपुत्र समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर या सरकारचे (Government) , सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी भिवंडी ,ठाणे , नवी मुंबई ,विमानतळ,जासई अशी कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विविध भूमिपुत्रांच्या सामाजिक संघटना आणि प्रतिनिधींची विशेष नियोजन बैठक काल सकाळी १० ते ३ या वेळेत ठाणे जिल्हा कोळी समाज हाॅल, चेंदणी कोळीवाडा बस स्टॉप, चेंदणी कोळीवाडा ठाणे पश्चिम येथे संपन्न झाली.
या नियोजन बैठकीला भिवंडी,पालघर ,वसई, मिरा – भाईंदर , उरण, रायगड, कल्याण डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई , ठाणे या मुंबई महानगर प्रदेश येथील विविध भूमिपुत्रांच्या विविध विषयांवर कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते त्या सर्वच संस्था , संघटनांनी दिबा मानवंदना कार रॅली यशस्वी होण्यासाठी व शासनकर्ते , सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक गाव आणि सामाजिक संघटना संपूर्ण सहकार्य, सहभाग व योगदान देतील अशी सर्व संघटना व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्वाही देण्यात आली.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मिठी नदी प्रकल्पाच्या खर्चात चौथ्यांदा कपात