Navi Mumbai Airport: बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) उद्घाटनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) शुक्रवारी दिली आहे.
या विमानतळावरील प्रत्यक्ष कामकाज नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. कामकाज सुरू झाल्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) ताण कमी होईल.
Navi Mumbai Airport: लंडनच्या हीथ्रो विमानतळाशी तुलना
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात मोठे विमानतळ ठरेल आणि त्याची तुलना लंडनच्या हीथ्रो विमानतळाशी केली जाऊ शकते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, या विमानतळाला गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणांशी जोडण्यासाठी थेट वॉटर जेट्टीची (जलवाहतूक) सोय असणार आहे, ही देशातील पहिलीच सुविधा आहे.
BIG News announced by Shri Vijay Singhal, MD and Vice Chairman CIDCO while speaking on the panel discussion on Building for Tomorrow's MMR
— MMRDA (@MMRDAOfficial) September 12, 2025
The Navi Mumbai airport would be inaugurated on 30th September and operations are expected to commence by November. The biggest airport in… pic.twitter.com/dXefF2cRVz
पनवेल जवळील उलवे येथे 1,160 हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारले जात आहे. हे विमानतळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गोवा हायवे आणि JNPT पोर्ट कॉम्प्लेक्सजवळ असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सोयीचे आहे.
प्रवासी आणि कार्गो क्षमता
NMIA चा पहिला टप्पा टर्मिनल 1 सह सुरू होत आहे, ज्याची वार्षिक क्षमता 2 कोटी प्रवाशांची असेल. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही सेवांचा समावेश आहे. 2032 पर्यंत, या विमानतळावर एकूण चार टर्मिनल असतील, ज्यांची एकूण प्रवासी हाताळणी क्षमता प्रति वर्ष 9 कोटींवर पोहोचेल.
केवळ प्रवासी सेवाच नाही, तर या विमानतळाची रचना एक मोठे ‘कार्गो पॉवरहाऊस’ म्हणूनही केली जात आहे. सुरुवातीला याची वार्षिक क्षमता 800,000 टन असेल, जी भविष्यात वाढवता येईल. इंडिगो (IndiGo) आणि आकासा एअर (Akasa Air) सारख्या प्रमुख एअरलाईन्सनी या नव्या विमानतळावरून सेवा सुरू करण्यास संमती दिली आहे.
हे देखील वाचा – AadityaThackeray : ‘BCCI पैशांसाठी खेळत आहे का?’; भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची जोरदार टीका