नीरव मोदीचा मेहुणा कबुली जबाब देणार

Nirav Modi brother-in-law will give a confessional statement


मुंबई– पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) कोट्यावधी रुपयांचा घोटाळा घोटाळा करुन देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदीच्या (Nirav Modi) विरोधात त्याचा बहिणीचा पती मयांक मोदी (Mayank Modi) कबुलीजबाब देणार आहे. तोही या बँक घोटाळ्यातील एक आरोपी असून त्यांनी लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंगद्वारे (Letter of Understanding) २३ हजार ७८० कोटी रुपयांची रक्कम बेकायदेशीर पद्धतीने वळवून आर्थिक फसवणूक केली होती.


मयांक मोदी याने या साऱ्या प्रकाराबाबत कबुलीजबाब देण्याची तयारी असल्याची याचिका सीबीआयने दाखल केली होती. विशेष न्यायाधीश अजय विठ्ठ्ल गुजराथी यांनी त्याला मान्यता दिली असून सीबीआय न्यायालयात (CBI Court) मेहता यांचा हा जबाब नोंदवणार आहे. मेहताच्या वकिलानेही (advocate) याला दुजोरा दिला आहे. न्यायालयाने यासंदर्भात मेहताला ११ ऑगस्टला त्याला हजर राहायला सांगितले आहे.


ईडीने (ED) मयांक मेहता याचे नाव या आधीच आरोपींच्या यादीत टाकले आहे. दरम्यान सीबीआयने गेल्या महिन्यात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातही त्याच्यासह इतरांची नावे समाविष्ट करण्यात आली. यामध्ये नीरव मोदीची बहीण व मयांक मेहताची पत्नी पूर्वी हिच्यासह आदित्य नानावटी यांचेही नाव आहे. या आरोपपत्रात लेटर ऑफ अडरस्टॅंडिंगद्वारे विविध खात्यांमधून मेहताच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या खात्यातही १० हप्त्यात पैसे वळवण्यात आले होते. हे पैसे पूर्वीने तिच्या पतीकडून मिळालेली भेट असल्याचे दाखवले होते.