Home / महाराष्ट्र / No Physical And Mental Punishment : शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी; विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यास मनाई..

No Physical And Mental Punishment : शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी; विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यास मनाई..

No Physical And Mental Punishment : शाळा म्हटलं कि आठवते ते निरागस बालपण मस्ती खोड्या. पण हे सगळं पूर्वीच्या काळी...

By: Team Navakal
No Physical And Mental Punishment
Social + WhatsApp CTA

No Physical And Mental Punishment : शाळा म्हटलं कि आठवते ते निरागस बालपण मस्ती खोड्या. पण हे सगळं पूर्वीच्या काळी ऐकायला अधिक छान वाटायचं पण आता या सगळ्या शब्दांना काहीही अर्थ राहिलेला नाही. महाराष्ट्रात (Maharashtra)राजकारणासोबतच इतरहि गोष्टी झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता शाळेत (School) शिक्षकांच्या अघोरी शिक्षांमुळे शाळेतील(School) वातावरण प्रचंड बदलेले दिसत आहे.

वसई(Vasai) येथील एका शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विध्यार्थी शाळेत उशिरा आल्याबद्दल शिक्षा म्हणून १०० उठाबशा काढायला लावल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली. आणि या प्रकाराची सरकारने देखील गांभीर्याने दखल घेतली. आणि वसई येथील या शाळेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याशिवाय शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी एक नियमावली जारी केली. ज्यात विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा देण्यास मोठी बंदी घातली आहे.

राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार महाराष्ट्रातील शाळांना आता अधिक कठोर बाल सुरक्षा आराखड्याचे अगदी नेटाने पालन करावे लागेल. ज्यात प्रामुख्याने शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळा यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील जर अशा घटना घडल्या तर या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना वेळेत अहवाल देणे बंधनकारक असणार आहे. हे निर्देश केंद्र सरकारच्या ‘शालेय सुरक्षा आणि संरक्षणावरील मार्गदर्शक तत्त्वे (२०२१)’ सर्व शाळांवर, मग त्या कोणत्याही मंडळाच्या किंवा व्यवस्थापनाच्या असल्या तरीही, त्यांच्यासाठी हे नियम बंधनकारकच असणार आहेत.

शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांवर शारीरिक किंवा मानसिक दबाव आणण्यास मनाई आहे. प्रतिबंधित कृत्यांमध्ये मारहाण करणे अथवा कानशिलात लावणे, कान अथवा केस ओढणे, विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावणे, त्यांना जास्त काळ उन्हात किंवा पावसात वर्गाबाहेर उभे करणे, विद्यार्थ्यांना ढकलणे, त्यांना गुडघे टेकवत जमिनीवर बसायला लावणे, शिक्षा म्हणून अन्न किंवा पाणी जप्त करणे आणि वारंवार अपमानास्पद वागणूक देणे यासगळ्याचा यात समावेश आहे.

याशिवाय शैक्षणिक किंवा सुरक्षिततेशी संबंधित कारणांसाठी अपरिहार्य असल्याशिवाय खासगी संदेश, चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद टाळावे असे निर्देश देखील शाळांना देण्यात आले आहेत. पालकांच्या आणि संस्थेच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो अथवा व्हिडिओ घेणे किंवा ते वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


हे देखील वाचा – Municipal Corporation Election 2025 : महापालिका निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर; आजपासूनच लागणार आचारसंहिता?राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या