Home / महाराष्ट्र / Sharad Pawar : जयंत पाटलांबद्दल पडळकर बरळले! शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Sharad Pawar : जयंत पाटलांबद्दल पडळकर बरळले! शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Sharad Pawar : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)पुन्हा बरळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते, आमदार जयंत...

By: Team Navakal
Sharad Pawar

Sharad Pawar : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)पुन्हा बरळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते, आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil)यांच्यावर पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. फडणवीसांनी पडळकरांना बोलताना भान राखण्याची समज दिली. याआधीही पडळकारांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपा नेतृत्व अडचणीत सापडले आहे.

जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता आत्महत्या प्रकरणावरून पडळकरांनी काल जयंत पाटील यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी पाटलांवर टीका करताना पडळकर बरळले. जयंत पाटलांचे वडील महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेते राजारामबापू पाटील (Rajarambapu Patil,)यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच असभ्य भाषा वापरली. यावरूनच पडळकरांविरोधात काल रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी आक्रमक झाली आहेत. आज जत आणि इस्लामपूर येथे पाटील समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत पडळकर यांच्याविरोधात मोर्चा काढला होता.

याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान योग्य आहे, असे माझे मत नाही. कोणाचेही वडील किंवा कुटुंबाबद्दल असे बोलणे योग्य नाही. पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे. यासंदर्भात शरद पवार यांचाही फोन आला होता. त्यांनाही सांगितले की, अशा विधानांना आमचे समर्थन नाही. ते एक तरुण आणि आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या वक्तव्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले आहे की, तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे बोलताना त्याचे काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोलले पाहिजे.

यावर पडळकर म्हणाले की, याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला होता. यासंदर्भात अशी वक्तव्य न करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करणार आहे. दरम्यान, यासंदर्भात जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत माध्यमांसमोर हात जोडत निघून गेले. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजकारणात अशा प्रकारे असंस्कृत वक्तव्य करणे चूक असल्याची टीका केली.


हे देखील वाचा –

महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मतदार यादीत घोटाळा संगणकाच्या मदतीने फेरफार! राहुल गांधींनी पुरावे दिले

मनमोहन सिंगांनी माझे आभार मानले! यासिन मलिकचा दावा

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद

Web Title:
संबंधित बातम्या