पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; एकनाथ खडसेंचे जावई अटकेत

Eknath Khadse's son-in-law arrested

पुणे – पुणे शहरातील खराडी परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसमध्ये (Guest house) सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave party) पोलिसांनी (Police) मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे ((Rohini Khadse)) यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर ((Dr. Pranjal Khewalkar)) यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने रॅडिसन हॉटेलच्या(Radisson Hotel) मागे असलेल्या स्टे बर्ड नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये (Stay Bird Guest House) ही कारवाई केली. छापेमारीदरम्यान मोठ्या आवाजात गाणे सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थ (Drugs), दारू(Alcohol) आणि हुक्क्याचे (Hookah) सेवन करत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू व हुक्के जप्त केले आहेत. ही पार्टी डॉ. प्रांजल खेवलकर यांनी स्वतः आयोजित केल्याची माहिती आहे. याशिवाय, या प्रकरणात प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव पुढे आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या कारवाईमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, खरे सांगायचे तर, हे होणारच होते, हे मला आधीच माहीत होते. गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही घटनादेखील त्याचाच एक भाग असू शकते. स्थानिक पोलीस दबावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जो दोषी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे सगळे जर एखादे षड्यंत्र असेल, तर ते जनतेसमोर यायला हवे.

Share:

More Posts