Pravin Darekar: क्षमतेपेक्षा जास्त लोकं आत घुसले, प्रवीण दरेकरांसह 17 जण 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले

Pravin Darekar Lift Incident

Pravin Darekar Lift Incident | मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) पुन्हा एकदा लिफ्टमध्ये (Pravin Darekar Lift Incident) अडकले. वसईतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलेंट ग्रँड बँक्वेट हॉलमध्ये ही घटना घडली.

ते स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जात होते. त्यांच्या सोबत आमदार स्नेहा दुबे आणि आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये अडकले होते.

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड

कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी जात असताना लिफ्टमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी लिफ्टमधील लाईटही बंद झाले होते. लिफ्टची क्षमता केवळ 10 व्यक्तींची असताना त्यात 17 जण गेले होते, त्यामुळे लिफ्ट अडकून पडली. तब्बल 10 ते 20 मिनिटांपर्यंत दरेकर आणि इतर लोक लिफ्टमध्ये अडकले होते.

यावेळी लिफ्टमध्ये बाहेरील संपर्क होऊ शकत नव्हता. काही कार्यकर्त्यांनी तात्काळ मदत मागवली आणि नंतर लोखंडी रॉड आणि इतर साधनांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. सर्वजण सुखरूप बाहेर आले. मात्र या घटनेमुळे तिथल्या इमारतीतील तांत्रिक देखभाल व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“लिफ्ट आणि माझी जुनी दुश्मनी” – दरेकरांचा मिश्किल टोमणा

घटनेनंतर दरेकरांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया देताना, “लिफ्ट आणि माझी जुनी दुश्मनी आहे” असे सांगितले. काही महिन्यांपूर्वी भिवंडी येथे पक्षाच्या कार्यक्रमात देखील ते अर्धा तास लिफ्टमध्ये अडकले होते. त्यावेळी मंदा म्हात्रे या त्यांच्यासोबत होत्या आणि त्या घाबरल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.

“यावेळी अजून थोडा वेळ झाला असता, तर काही अनर्थ घडला असता,” असे म्हणत त्यांनी लिफ्टमधून सुटका झाली असली तरी अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षा बाबतीत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा –

सभागृहात जंगली रमीचा डावमंत्री कोकाटेंवर विरोधकांची टीका

Tax Free Countries: पूर्ण पगार तुमचाच! जगातील ‘हे’ आहेत असे देश जिथे भरावा लागत नाही कर