दिवा ते मुंबई लोकलसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू

Protest for train services between Diva and CSMT

ठाणे– मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा ते सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)दरम्यान लोकल सेवा सुरू करावी. दिवा जंक्शन (Diva junction)असल्याने इथे सर्व जलद लोकल थांबवण्यात याव्यात, या मागणीसाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

धरणे आंदोलनाचा आजचा आठवा दिवस (eighth day of the protest)होता.याआधी याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम, मोर्चा, उपोषण, ढोल बजाव आंदोलन करूनही रेल्वे प्रशासनास (railway administration) जाग आली नाही. फेब्रुवारी नाहीतर जूनमध्ये लोकल चालू होणार होती.परंतु प्रत्यक्ष काहीच झाले नाही. ९ जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे जलद मार्गावर अपघात होऊन जीव गेले तरीही रेल्वे प्रशासन स्पष्ट भूमिका मांडत नाही. लोकल चालू का होत नाही? लोकल चालू व्हावी लोकांचे जीव वाचावेत ही दिवेकरांची मागणी आहे.त्यामुळे आता जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार ,असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यां अश्विनी केंद्रे (Ashwini Kendre)यांनी रेल्वे प्रशासनास दिला आहे.