Pune News | पुण्यात वाहतुकीचा ‘डबल डेकर’ उपाय! आणखी 10 दुमजली उड्डाणपूल होणार

Pune Double-decker flyovers

Pune Double-decker flyovers | पुण्यातील वाहतूक कोडींची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. यातच आता पुणे महानगरपालिका (PMC) शहरात वाहतूक कोंडी (traffic congestion) कमी करण्यासाठी आणखी 10 दुमजली उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे.

कर्वे रस्ता आणि गणेशखिंड रस्ता) या दोन प्रमुख मार्गांवरील यशस्वी दुमजली उड्डाणपुलांनंतर (Double-decker flyovers) आता पुणे महानगरपालिका (PMC) आणखी 10 दुमजली उड्डाणपूल उभारणार आहे.

या नव्या उड्डाणपुलांची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या संयुक्त भागीदारीत केली जाणार आहे. या प्रकल्पात वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग (Metro line) आणि खालच्या स्तरावर मोटार वाहतुकीचा मार्ग असा दुहेरी वापर केला जाणार आहे.

PMC अधिकाऱ्यांची माहिती

या योजनेविषयी बोलताना PMC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “वाहतूकीचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले आहे. त्यामुळे आता अशा ठिकाणी याचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.”

PMC आणि Maha-Metro च्या संयुक्त प्रयत्नांतून बांधलेला नळ स्टॉपजवळील (Nal Stop) दुमजली उड्डाणपूल सध्या कार्यान्वित असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. तसेच, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचा भाग असणारा गणेशखिंड रस्त्यावरील पूल अंतिम टप्प्यात आहे.

प्रस्तावित नवीन उड्डाणपुलांचे ठिकाण

  • मुंढवा – महात्मा फुले चौक
  • सोलापूर रस्ता – काळुबाई चौक
  • दांडेकर पूल चौक
  • आव्हाळवाडी चौक, वाघोली
  • वारजे – आंबेडकर चौक
  • भुसारी कॉलनी – कोथरूड बस डेपो
  • गोळीबार मैदान चौक
  • विमान नगर चौक
  • फातिमानगर चौक, वानवडी
  • रविदर्शन जंक्शन, मांजरी

या प्रकल्पामुळे उभी जागा अधिक प्रभावीपणे वापरली जाईल. ज्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरण शक्य नाही, तिथे हा पर्याय वाहतुकीसाठी फायद्याचा ठरू शकतो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुणेकरांना प्रवासात मोठा दिलासा मिळेल. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, हे उड्डाणपूल प्रवासाचा कालावधी कमी करण्यास उपयुक्त ठरतील.