Home / महाराष्ट्र / Municipal Elections 2025 : पुण्यात राजकीय भूकंप! अजित पवार आणि ठाकरेंना खिंडार पाडत 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Municipal Elections 2025 : पुण्यात राजकीय भूकंप! अजित पवार आणि ठाकरेंना खिंडार पाडत 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Municipal Elections 2025 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुंबईत भाजपचे...

By: Team Navakal
Municipal Elections 2025
Social + WhatsApp CTA

Municipal Elections 2025 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 22 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या ‘जम्बो’ पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीसह सत्ताधारी अजित पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे. यामध्ये अनेक माजी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश असल्याने विरोधकांच्या गडांना मोठे सुरुंग लागले आहेत.

पुण्यात आमदारपुत्रासह दिग्गजांचे ‘कमळ’ हाती

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुरेंद्र पठारे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि रोहिणी चिमटे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.

हडपसर मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का बसला असून तुपे परिवारातील अनेक सदस्यांसह बाबा शिवरकर समर्थक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ज्या प्रभागांमध्ये भाजपला स्वबळावर अडचण होती, तिथे या वजनदार नेत्यांना पक्षात घेतल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठे खिंडार

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने अजित पवार गटावर मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उबाठा पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासोबतच अजित पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे आणि उषा वाघेरे यांसारख्या मातब्बर नेत्यांनी कमळ हाती घेतले. अजित पवारांनी गेल्या काही दिवसांत भाजपचे ३ नगरसेवक फोडले होते, त्याला भाजपने १३ हून अधिक बड्या नेत्यांना पक्षात घेऊन ‘जशास तसे’ उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

निष्ठावंतांची खदखद आणि बंडाचा इशारा

एकीकडे भाजपमध्ये मोठे इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या इच्छुकांनी या पक्षप्रवेशांविरोधात जोरदार आंदोलन केले.

“जर आयत्या वेळी येणाऱ्यांना उमेदवारी दिली, तर आम्ही बंड करू,” असा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला आहे. “आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले आणि आता बाहेरून आलेल्यांना तिकीट मिळणार असेल, तर मग मुलाखती कशासाठी घेतल्या?” असा सवाल या इच्छुकांनी उपस्थित केला आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार हे प्रवेश करण्यात आले असून स्थानिक विरोध डावलून भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या