Home / महाराष्ट्र / Pune News : केंद्र सरकारचे पुणेकरांना मोठे गिफ्ट! 1000 नव्या इलेक्ट्रिक बसेस खरेदीला मंजुरी

Pune News : केंद्र सरकारचे पुणेकरांना मोठे गिफ्ट! 1000 नव्या इलेक्ट्रिक बसेस खरेदीला मंजुरी

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच क्रांती घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र...

By: Team Navakal
Pune News
Social + WhatsApp CTA

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच क्रांती घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह (PM-e Drive) योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (PMPML) तब्बल 1000 नव्या इलेक्ट्रिक बस (E-Buses) खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या महत्त्वाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे, ज्यामुळे PMPML च्या ताफ्यात या बसेस लवकरच दाखल होतील.

वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे उद्दिष्ट

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाबद्दल आभार मानले. मोहोळ म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने, सध्याच्या 2000 बसेसऐवजी PMPML ला किमान 3000 बसेसची गरज आहे. या 1000 ई-बसेसमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषण नियंत्रणात मदत होईल आणि नागरिकांना आधुनिक, आरामदायक प्रवासाची सुविधा मिळेल. या निर्णयामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होणार आहे.

पाठपुराव्यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण साथ

मुरलीधर मोहोळ यांनी या 1000 ई-बसेसच्या मंजुरीसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सातत्याने समन्वय साधला. मोहोळ म्हणाले, “या बसेससाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला आवश्यक पत्र तातडीने पाठवले. त्यानंतर PMPML मार्फत हा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. नवी दिल्लीत एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले, जे आता पूर्ण झाले आहे.”

मेट्रोसोबत PMPML चा विकास

मोहोळ यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने नेहमीच भर दिला आहे. सध्या शहरात 32 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो तसेच मेट्रोच्या विस्तारित मार्गांनाही मान्यता मिळाली आहे.

“या मेट्रो प्रकल्पांसोबतच PMPML चे सक्षमीकरण करणे हा माझा प्रमुख अजेंडा आहे. PMPML च्या ताफ्यात जास्तीत जास्त बस लवकरात लवकर दाखल व्हाव्यात, यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा – Jio OTT Plans : Netflix, Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन! जिओचे ‘हे’ स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या