Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे उद्याचे पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग
सकाळी ११:०५ ते दुपारी ०३:४५ पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:३६ ते दुपारी ३:१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबनार आहे. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी ११:०३ ते दुपारी ३:३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आल्याची माहिती आहे.
ट्रान्स हार्बर मार्ग : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी ११:१० ते दुपारी ०४: १० पर्यंत
ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत. ठाणे – वाशी / नेरुळ / पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द केल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे : बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत
ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवलीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द देखील करण्यात येतील. तर, अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवल्या जाणार आहेत.
त्यामुळे उद्या रेल्वेमुळे प्रवाशांना नवीन मनस्तापाला सामोरे जावे लागणार असे दिसत आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Holidays 2026 : महाराष्ट्र शासनाच्या 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट









