Home / महाराष्ट्र / Air-conditioned local coach : वातानुकूलित लोकल डबे खरेदीसाठी जागतिक निविदा

Air-conditioned local coach : वातानुकूलित लोकल डबे खरेदीसाठी जागतिक निविदा

Air-conditioned local coach : मुंबई (Mumbai) करांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या सेवेत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी मोठे पाऊल टाकण्यात आले आहे....

By: Team Navakal
Air-conditioned local coach

Air-conditioned local coach : मुंबई (Mumbai) करांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेच्या सेवेत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. वातानुकुलित लोकल डब्ब्यांसाठी (Air-conditioned local coach) मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC)२१ हजार कोटींची जागतिक निविदा काढली आहे. २,८५६ वातानुकूलित (AC) डब्ब्यांची खरेदी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी ही निविदा आहे. वंदे मेट्रो (Vande Metro) प्रकारातील या लोकल १२, १५ आणि १८ डब्ब्यांच्या असतील.

सध्या मुंबईतील बहुतेक लोकल १२ डब्यांच्या आहेत. काही लोकल १५ डब्यांच्याही आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन एमआरव्हीसीने १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार करण्याचा आणि भविष्यात १८ डब्यांच्या रेक्सची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी दोन नवीन देखभाल डेपो निर्माण करण्यात येणार आहेत. इथेच पुढील ३५ वर्षांसाठी डब्यांची संपूर्ण देखभाल केली जाईल.

नवीन वंदे मेट्रो डब्बे विशेषतः उपनगरीय वापरासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. हे डब्बे स्वयंचलित दरवाजे, आरामदायक आसनव्यवस्था, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, मनोरंजन सुविधा आणि मुंबईच्या हवामानासाठी योग्य अशा एचव्हीएसी प्रणालींनी युक्त असतील. या गाड्या १३० किमी/ताशी वेगाने धावू शकतील. उत्तम ब्रेकिंग आणि गतीमुळे वेळेचे नियोजन अधिक अचूक होईल. एमआरव्हीसीचे प्रमुख विलास सोपान वाडेकर म्हणाले, हा प्रकल्प म्हणजे मुंबईच्या शहरी वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा दररोजचा प्रवास अधिक सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि दर्जेदार होईल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कपिल देव यांच्यावरील मॅचफिक्सिंगची फाइल का बंद ?

भारतावरील टॅरिफ योग्य’; अमेरिकेच्या अतिरिक्त कर लावण्याच्या धोरणाला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा

मिठी नदी प्रकल्पाच्या खर्चात चौथ्यांदा कपात

Web Title:
संबंधित बातम्या