Home / महाराष्ट्र / Raj Thackeray: मनसेचा पदाधिकाऱ्यांचा ३० ऑगस्टला मेळावा

Raj Thackeray: मनसेचा पदाधिकाऱ्यांचा ३० ऑगस्टला मेळावा

Raj Thackeray

Raj Thackeray- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवार ३० ऑगस्ट रोजी ठाण्यात पार पडणार असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

ठाण्यातील सी.के.पी. हॉल येथे सकाळी ११.३० वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः या मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिका निवडणुकीत मनसे कोणत्या पद्धतीने तयारी करणार, कोणती भूमिका घेणार आणि प्रचारासाठी कोणती रणनिती आखली जाणार याबाबतच्या चर्चा या मेळाव्यात होण्याची शक्यता आहे.