Sanjay Gaikwad Viral Video | शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. बुलढाण्याचे हे आमदार पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असताना ही घटना घडली. गायकवाड यांनी कॅन्टीनच्या जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचे जाहीर केले आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी रात्री गायकवाड यांनी आमदार निवासातील रूम नंबर 107 मधून जेवण मागवले. मात्र, त्यांना मिळालेली डाळ आंबट आणि दुर्गंधीयुक्त होती. “त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी थेट कॅन्टीन गाठून कर्मचारी आणि व्यवस्थापकाला जाब विचारला. व्हायरल व्हिडिओमध्ये ते टॉवेल आणि बनियनवर कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनीही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.
आमदार निवासात संजय गायकवाडांना शिळं जेवण दिलं
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) July 9, 2025
बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं
शीळ व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये घातला राडा…
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण
आज सभागृहात मुद्दा… pic.twitter.com/ajTbCBhP3l
कॅन्टीन कर्मचारी माफी मागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. असे असताना देखील गायकवाड कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
गायकवाड यांनी कॅन्टीनच्या जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “आमदारांना विषारी जेवण मिळते, तर सामान्य माणसांचे काय?” यापूर्वीही त्यांनी दोन-तीन वेळा तक्रार केल्याचे सांगितले. त्यांनी जेवणाचे बिल न भरण्याचे आणि हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचे जाहीर केले.