Sanjay Raut : राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना मात्र मोठा वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना देखील पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत; तर, मुंबई (Mumbai) महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधूनी देखील जोर लावला आहे. त्यासाठी ठाकरे बंधूंची युतीची घोषणा देखील लवकरच होणार आहे. याच पार्शवभूमीवर कालच आदित्य ठाकरे यांनी काळ वरळी डोम येते सभा घेतली. आगामी निवडणुकीचा आराखडा लोकांसमोर त्यांनी मांडला. याशिवाय त्यांनी सत्ताधार्यांना देखील आपलं लक्ष बनवलं.
त्यांच्या या सभे नंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंच्या रणनीतीची माहिती दिली. ठाकरेंमधील जागावाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्यावर आल्याचे ते म्हणले शिवाय या चर्चाना आज पूर्णविराम लागणार असलयाचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली देखील सुरू झाल्याचे दिसत आहे.
या संधर्भात शरद पवार साहेबांशी सुद्धा चर्चा होणार असल्याचे ते म्हणले. जागावाटपानंतर युतीची घोषणा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगिलते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या मध्ये आता कुठल्या प्रकारचा गोंधळ नाही. असे देखील ते म्हणले.
शिवतीर्थावर सभेची सांगता आणि सभेच्या आरंभाविषय देखील त्यांनी भाष्य केले आहे. शिवतीर्थाशी शिंदेंच्या शिवसेनाच काय संभंध असा सवाल देखील त्यांनी केला आहे. शिवतीर्थावर सुरवातीपासूनच ओरिजनल शिवसेनाच कायम सभा घेत आली आहे. आता काल उदयास आलेल्या शिवसेनेचा शिवतीर्थाशी काय संभंध असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
शिंदेंची शिवसेना अमित शहांची टेस्ट्युब बेबी असल्याचे मिश्किल वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले आहे. शिंदेची शिवसेना हा तात्पुरता जन्म आहे. तुमची तात्पुरती व्यवस्था भाजपाने केली आहे. असेही ते म्हणले. पुढे महायुतीचे जागावाटप टप्प्या टप्प्याने होणार असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणतात भाजप आणि शिवसेना अजून टप्पा टप्पाच खेळत आहेत. त्यांना टप्यातच राहूदे. महाराष्ट्रात भाजपा युनिट शिंदेंच्या शिवसेनेने सोबत काम करायला तयार नाही. हे अमित शहाणी लादलेले लग्न आहे. हे लग्न मानाने मोडलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेनेला भाजपच्या चरणाशीच बसून राहायचं आहे. त्यातुनच हे सगळे गोंधळ सुरु असल्याची घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा देखील येत्या काळात होणार असल्याचे ते म्हणले. त्यामुळे आता हि युती राज्यातील राजकारला कोणतं नवीन वळण देते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – IPL 2026 Auction : आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?









